Friday, January 2, 2015

मला एक कळत नाय..



मला एक कळत नाय माणस अशी वागतात काय
आपलीच नसतात आपली,
दुसर्यांना दोष देण्यात अर्थच काय
मनगटात नसेल ताकद तर
नशीबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही
मला एक कळत नाय ,माणस  अशी वागतात काय


क्षणांचे असतात सारे सोबती
कोणी कोणाला पुरत नाय
वेड्या मनाला असते खोटीच आस
कोणी तरी आपले असेल काय
मला एक कळत नाय, माणस अशी वागतात काय


प्रत्येक क्षणातला  अनुभवयाचा असतो आनंद
सामावून घ्यायला सगळ्यांना तो जमेलच असं नाही
सोडून जायचं इथेच सगळ, बरोबर काही न्यायचं  नाय
मला एक कळत नाय माणस अशी वागतात काय


दुखः म्हणाले काल मला
सोबत माझ्याशी तुझी सुटायची नाय

मी म्हणालो हसत त्याला
सुखाचे चार क्षण अजून  झोळीत पडलेच नायत
मला एक कळत नाय, माणस अशी वागतात काय

No comments:

Post a Comment